‘या’ तारखेपासून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा सरकारचा विचार


मुंबई – राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. सध्या सगळी मदार ऑनलाईन शिक्षणावरच आहे. पण आता महाविद्यालये उघडण्यासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे.

आज पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत म्हणाले की, सीईटी परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. सामंत यांनी यावेळी सीईटी परीक्षेच्या तारखाही जाहीर केल्या. ते म्हणाले, यावर्षी सीईटीला एकूण आठ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थी बसणार आहेत. मागच्या वर्षी सीईटीची १९७ केंद्रे होती. यावर्षी त्यात वाढ झाली असून २२६ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने यंदा ही परीक्षा घेतली जाणार आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत ही सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.