आईबरोबर घराबाहेर पडल्यास लोक समजतात गर्लफ्रेंड आहे


जगात सध्याच्या घडीला क्वचित अशी एखादी व्यक्ति भेटेल जी स्वतःला तरुण आणि तंदुरुस्त ठेवू इच्छित नाही. तथापि, वयाबरोबर लोकांचे सौंदर्य हळूहळू कमी होते, मग ती स्त्री असो की पुरुष, पण अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या या महिलेचे जणू काही वय वाढायचेच थांबले आहे. त्यामुळे तिचे नक्की वय काय हेच कळत नाही. त्याचबरोबर ती जेव्हा आपल्या मुलाबरोबर घराबाहेर जाते. तेव्हा लोक त्यांच्याकडे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड याच दृष्टीकोनातून पाहतात.

जोनाथन नुयेन नावाच्या 22 वर्षीय युवकासोबत हे वारंवार घडते. जेव्हा तो आपल्या 40 वर्षीय आईसह घराबाहेर पडतो तेव्हा लोक दोघांनाही पाहून आश्चर्यचकित होतात. ते त्यांना एकतर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा बहिण-भाऊ असल्याचे समजतात.

ऑस्ट्रेलियन फेसबुक ग्रुप सेबल एशियन ट्रायट्समध्ये या अनोख्या घटनेविषयी जोनाथानने लिहिले आहे. या पोस्टवर 7000 पेक्षा जास्त लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युझरने लिहिले की, तुमची आई खूप सुंदर आहे, पण मी तिला तुमची मैत्रीण म्हणून समजलो. मी विचार करत होतो की जोडपे किती सुंदर आहे.

लोकांनी जोनाथनला त्याच्या आईचे सौंदर्य आणि तरुण राहण्याचे रहस्य विचारण्यास सांगितले आहे, याविषयी जोनाथनने सांगितले की त्याची आई दररोज भरपूर फळे खाते आणि व्यायाम करते. तसेच जोनाथनने पुढे सांगितले की कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहार घ्या आणि जास्त चरबीयुक्त आहार आणि पूर्व-तयार पदार्थ खाणे टाळा.


जोनाथनने आपल्या इंस्टाग्रामवर आईबरोबरची छायाचित्रेही शेअर केली आहेत आणि तिथेही लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, यावर जोनाथनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Leave a Comment