लठ्ठपणा कमी करण्यासाठी संध्याकाळी नेहमी रडा


अनेकजण आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. त्यासाठी ते कधी जिमला जातात तर कधी योगासने करतात. डाएटमध्ये अनेक बदल करणे तर कधी कधी अनेक दिवस उपवास करण्यासारखे चित्र-विचित्र उपाय आजमावत असतात.

फक्त रडूनही तुम्ही तुमचा लठ्ठपणा कमी करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला आम्ही सांगितलेला उपाय वाचून थोडे आश्चर्य वाटले असेल पण हे एका संशोधनात सिद्ध झाले आहे. या संशोधनात रडल्यामुळे एखादी व्यक्ती त्यांचे थोडे फार वजन कमी करू शकते, असे सिद्ध झाले आहे.

एशियन वनमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, शरीरातील कॉर्टिसोन नामक हार्मोन रडल्यामुळे रिलीज होतात. या हार्मोनचे प्रमाण शरीरात वाढल्याने वजन कमी होते. त्याचबरोबर जेव्हा आपण तणाव वाढल्यानंतर रडतो तेव्हा अश्रूंमधून एक विशिष्ट पदार्थ शरीरातून बाहेर पडतो. या पदार्थामुळे कमी होते.

संशोधनानुसार, रडताना सहसा ज्या लोकांचे अश्रू निघत नाहीत, वजन कमी करणे त्यांच्यासाठी त्रासदायक असते. या संशोधनात एक खास गोष्ट सांगण्यात आली ती म्हणजे खोटे रडल्याने किंवा रडण्याचे नाटक केल्याने वजन कमी होत नाही.

संधोशनात असे देखील सांगण्यात आले आहे की, फक्त तीन प्रकारेच अश्रू मनुष्याच्या डोळ्यातून येतात. बेसल, रिफ्लेक्स आणि सायचिक, बेसल अश्रू अनेकदा आनंदामुळे येतात. तर सिगरेट किंवा प्रदुषणाच्या धुरामुळे रिफ्लेक्स अश्रू हे निघतात. सायचिक अश्रू भावुक झाल्यामुळे येतात आणि याच अश्रूंमुळे वजन कमी होते.

रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत झोपल्यावरही वजन कमी होते. ही अशी वेळ असते जेव्हा मनुष्याच्या मनात नकारात्मक भावना सर्वाधिक प्रमाणात येते. मनुष्याच्या शरीरातील कॅलरीज रडण्यामुळे मोठ्या प्रमाणात बर्न होतात, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment