पुण्यात नव्याने निर्बंध लादणार नाही, पण पुणेकरांनी ती वेळ सरकारवर आणू नये – अजित पवार


पुणे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातले. दरम्यान आता तिसऱ्या लाटेची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्याने निर्बंध लादणार का, यावर स्पष्टीकरण दिले.

यावेळी अजित पवार म्हणाले, मास्क काढला, तर खूप मोठ्या प्रमाणावर परिस्थिती बदलत आहे. पुण्यात जिथे जिथे कार्यक्रम, वाढदिवस झाले. तिथे संपुर्ण घरे कोरोनाबाधित आले आहेत. पुण्यात नव्याने निर्बंध लादणार नाही, पण ती वेळ पुणेकरांनी सरकारवर आणू नये.

देशात महागाई भडका उडाला आहे. गॅस डिझेल पेट्रोलच्या भावात खूप वाढ झाली आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले, अनेकांचे उद्योग अडचणीत आले आहेत. त्यासाठी लोकांनी आंदोलनं केली. पण याची दखल घेताना केंद्र सरकार दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दहा महिने होत आले, पण चर्चा होताना दिसत नाही. आता तर लोकसभेचे अधिवेशन देखील संपले आहे. आता पुढच्या वर्षी अधिवेशनातच हा मुद्दा उपस्थित करता येईल. सध्या केंद्र सरकारची असलेली भूमिका ही देशाच्या जनतेचे दुर्दैव असल्याचे अजित पवार म्हणाले.