‘दैव देते अन् कर्म नेते’; पुन्हा रस्त्यावर रानू मंडल यांना गाताना पाहून नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया


डोक्यावर छप्पर आणि कुणाचाही आधार नसताना रानू मंडल या केवळ सुरेल आवाजाच्या जोरावर सोशल मीडियाद्वारे रोतोरात स्टार झाल्या होत्या. रानू यांचा कोलकातामधील एका रेल्वे स्टेशनवर गाणे गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर आपल्या चित्रपटामध्ये रानू यांना गाणे गाण्याची संधी बॉलिवूड गायक हिमेश रेशमियाने दिली. पण, नंतर रानू या बॉलीवूडमधून गायब झाल्या. आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा रानू यांचा रस्त्यावर गाणे गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ सौजन्य – Mr hruday thakre
रानू मंडल यांचा रस्त्यावर गाणे गातानाचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. त्या जुन्या वेशभूषेत या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. तसेच त्या एका गाडीसमोर ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणे गाताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.