मेट्रोच्या मोफत प्रवासासाठी करावे लागेल हे काम


दिल्लीमध्ये महिलांना मेट्रोमध्ये मोफत प्रवास करता यावा यासाठी दिल्ली सरकार मोठ्या प्रमाणात काम करत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर मॉस्कोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत असून, तेथे लोकांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र मोफत तिकीट मिळवण्यासाठी प्रवाश्यांना 30 वेळा उठाबशा काढाव्या लागणार आहेत.

जो व्यक्ती 2 मिनिटांच्या आत 30 उठाबशा काढेल, त्यांना मेट्रोमध्ये मोफत प्रवास करण्याची संधी मिळत आहे. लोकांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

ट्विटरवर अनिल चोप्रा नावाच्या एका माजी एअर मार्शलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती मशीनवर उठाबशा काढत आहे. त्या व्यक्तीने 2 मिनिटात 30 सिटअप्स काढताच मशीनमधून एक तिकिट बाहेर येत आहे.


हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. या व्हिडीओल आतापर्यंत तब्बल दीड लाख लोकांनी बघितले आहे. 2 हजार युजर्सनी रिट्विट केले असून, 8 हजार जणांनी हे ट्विट लाईक केले आहे.

मॉस्को हे जाड्या लोकांच्या यादीत प्रथम क्रंमाकावर आहे. त्यामुळे तेथील सरकार अशा नवनवीन ऑफर काढत असते. याआधी देखील 2015 मध्ये 10 स्क्वाट केल्यावर सबवेचे तिकिट देण्यात येत होते.

Leave a Comment