तालिबान विरोधकांना भारतात आश्रय दिला तर महागात पडेल, अफगाणी नेत्याचा इशारा


काबूल – तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज झाल्यानंतर साऱ्या जगाचे लक्ष त्यांच्या भूमिकांकडे लागून आहे. खासकरून शेजारील राष्ट्र असल्यामुळे भारताची अफगाणिस्तानातील प्रत्येक घडामोडींवर नजर आहे. आता भारताला अफगाणी नेत्याने इशारा दिला आहे. जर भारतात तालिबान विरोधकांना आश्रय दिला, तर महागात पडेल, असा इशारा अफगाणी नेते गुलबुद्दीन हेकमत्यार यांनी दिला आहे.

भारताने तालिबान विरोधकांना आश्रय देऊ नये. यापासून त्यांनी लांब राहीले पाहिजे. तालिबान विरोधात आश्रय देऊन सरकारविरोधात व्यासपीठ देण्यासारखे असल्यामुळे त्यामुळे तालिबानला कृती करणं भाग पडेल, असे गुलबुद्दीन हेकमत्यार यांनी सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

काश्मीर प्रश्नामध्ये अफगाणिस्तान आणि त्यांच्या नविन राजकर्त्यांना रस नाही. अफगाणिस्तान भूमीचा वापर इतर देशांना करू देणार नाही. याबाबत भारताने काळजी करु नये, असंही त्यांनी पुढे सांगितले. अफगाणिस्तानवर दोन देश सत्ता मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. या अपयशाचा भारताने पुनर्विचार करावा आणि ऐतिहासिक चुका भरून काढाव्या, असे देखील त्यांनी पुढे सांगितले. आता अफगाणिस्तानबद्दल भारताने सकारात्मक भूमिका घ्यावी. यापूर्वी त्यांनी सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेला देशांनी केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले आहे. भारताने गेल्या चार दशकातील चुका दुरुस्त केल्या पाहिजेत. विदेशी राजवटींचे समर्थन करू नये, असे देखील सांगितले.

२०१७ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती अशरफ घनी यांनी ७२ वर्षीय हेकमत्यार यांना माफी दिली होती. १९९२ ते १९९६ दरम्यान काबुलमध्ये हजारो नागरिकांना ठार मारल्याचा हेकमत्यार यांच्यावर आरोप आहे. ते दोन वेळा अफगाणिस्तानचे पंतप्रधान देखील होते. त्यानी जून १९९३ आणि जून १९९६ मध्ये या वर्षात पंतप्रधानपदावर होते.