राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही : वर्षा गायकवाड


मुंबई – राज्यातील ठाकरे सरकारने सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्ण सर्वोच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांच्यामध्ये 21 व्या शतकातील कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पाठ्यपुस्तकाच्या मर्यादेपलीकडे जाऊन शिकणे आणि शिकविणे या दोन्ही क्रिया घडाव्यात, शिक्षणाच्या प्रती समाज सक्रीय व्हावा, सरकारी शाळांबद्दल पालकांचा विश्वास वाढावा यासाठी महत्वाची योजना जाहीर करण्यात आली आहे.

शाळेतील पटसंख्या वाढावी या हेतूने राज्यातील शासकीय शाळांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत आदर्श शाळांची निर्मिती करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून सदर शाळांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीकोनातून आज राज्य मंत्रिमंडळामध्ये 5 मार्च 2021 च्या शासन निर्णयान्वये पहिल्या टप्प्यातील निवड करण्यात आलेल्या 488 शाळांसाठी 494 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.