स्पेस एक्सने अंतराळस्थानकात दिली मुंग्या, ताज्या फळांची डिलीव्हरी

एलोन मस्क यांच्या स्पेस एक्स रॉकेटने अंतराळ स्थानकात मुंग्या, ताजी फळे, मानवी आकाराचा रोबोटिक आर्म अश्या अनेक वस्तूंची डिलीव्हरी केली आहे. रविवारी स्पेस एक्सचे रॉकेट या सर्व सामानासह अंतराळ स्थानकाच्या दिशेने रवाना झाले आणि सोमवारी हे सामान अंतराळस्थानकात पोहोचणार आहे. गेल्या दशकात भारत स्पेस एक्सने केलेली ही २३ वी डिलीव्हरी आहे.

पुन्हा पुन्हा वापरता येणाऱ्या फाल्कन रॉकेटने नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधून रविवारी उड्डाण केले. अंतराळ स्टेशन मध्ये असलेल्या ७ अंतराळवीरांसाठी आईस्क्रीम, आवाकडो, लिंबे, खूप ताजी फळे, प्रयोगासाठी मुंग्या आणि रोबोटिक आर्म असे २१७० किलो सामान ड्रॅगन कॅप्सूल मधून पाठविले गेले. पहिल्या स्टेजच्या क्रुझर रॉकेटने स्पेस एक्सच्या समुद्रातील प्लॅटफॉर्मवर म्हणजे ग्रॅव्हीटास वर यशस्वी लँडिंग केल्याचे स्पेस एक्सने जाहीर केले आहे.