शाहरुखची मुलगी सुहाना खानचा ट्रान्सपेरेंट टॉपमधील फोटो व्हायरल


बॉलिवूडचा किंग खान अर्थात सुपरस्टार शाहरुख खान याचा जगभरात आपला वेगळा असा चाहतावर्ग आहे. आपल्या सिनेकारकिर्दीत एकाहून एक दर्जेदार चित्रपट शाहरुखने प्रेक्षकांना दिले आहेत. त्याचसोबत त्याच्या प्रत्येक चित्रपटांना चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद दिला जातो. अशातच आता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान हिच्या बद्दल सुद्धा नेहमीच चर्चा सुरु असतात. सुहाना ही त्यासोबतच सोशल मीडियावर सुद्धा कायम अॅक्टिव्ह असून तिने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. सुहाना हिने यामध्ये ट्रान्सपरेंट टॉप घातल्याचे दिसून येत आहे.

आपल्या इंस्ट्राग्राम स्टोरीवर सुहाना खान हिने ट्रान्सपेरेंट टॉप घातल्याचा फोटो शेअर केला आहे. तसेच ती उन्हामध्ये उभी असून अत्यंत खास पोज देत असल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान तिने व्हाइट रंगाचा ट्रान्सपेरेंट टॉप आणि ब्लू रंगाची हाफ पॅंन्ट घातली आहे. सुहाना खान हिने अलिकडेच आपले इंस्टाग्राम अकाऊंट पब्लिक केले आहे. त्यानंतर तिच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली. त्याचबरोबर तिच्या नावाने सोशल मीडियावर अनेक फॅन क्लब अॅक्टिव्ह आहेत.