आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक


मुंबई : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत वेळो वेळी जारी करण्यात आलेले आदेश आजपासून लागू होणार असल्याचे पत्रक राज्य शासनाकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या नियमांप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तीने जरी लसीचे दोन्ही डोस पूर्ण घेतले असले तरी कोरोनाची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी करणे बंधनकारक आहे हाच नियम राज्यातही लागू राहील असे पत्रक राज्य सरकारने प्रसिध्दीस दिले आहे.