WhatsApp वरील तुमचा प्रोफाईल फोटो कुणी पाहावा हे तुम्ही करु शकता मॅनेज


नवी दिल्ली – सध्याच्या सगळ्याचेच लाडके बनलेले इस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे जगभरात सर्वाधिक लोकप्रिय अॅप बनले आहे. हे अॅप लोकप्रिय बनण्यामागे तसेच कारण देखील आहे. हे अॅप आपल्या प्रत्येक यूजर्सच्या सोयीची काळजी घेते. व्हॉट्सअॅप यूजर्सच्या गरजेनुसार नवनवीन फीचर आपल्या अॅपमध्ये वारंवार आणत असते. आता देखील व्हॉट्सअॅपने एक असेच फीचर आणले आहे, ज्यामुळे तुमचा प्रोफाईल फोटो कुणी पाहावा, हे तुम्हीच ठरवू शकणार आहात. त्यामुळे तुमच्या प्रोफाईल फोटोची गुप्तता जपली जाणार आहे.

तुमच्या प्रोफाईल पिक्चरचा बऱ्याचदा लोक स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि तुम्हाला त्याची काही माहिती देखील नसते. हे प्रायव्हसीच्या दृष्टीने योग्य नाही. अशा परिस्थितीत तुमचा प्रोफाईल फोटो कुणी पाहावा हे आता तुम्हीच ठरवू शकता. तसेच यामुळे आता तुमचा प्रोफाईल फोटो फक्त तुमचे मित्र, कुटुंबिय इत्यादी लोक पाहू शकतील. पण हे करायचे कसे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर चितींत होऊ नका. याची सविस्तर माहिती आम्ही आज तुम्हाला देत आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे प्रक्रिया ?

अशा प्रकारे हाईड कराल व्हॉट्सअॅपवरील प्रोफाईल फोटो

  1. सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल.
  2. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या Settings मध्ये जावे लागेल.
  3. त्यातील Account पर्यायामध्ये जाऊन Privecy पर्यायावर टॅप करावे लागेल.
  4. त्यानंतर, प्रोफाइल पिचरवर टॅप करावे लागेल.
  5. व्हॉट्सअॅपवरील डिफॉल्ट सेटिंगमध्ये, तुमचा प्रोफाइल फोटो सर्वांना पाहण्याची परवानगी आहे.
  6. जर तुमचा प्रोफाईल फोटो तुम्हाला फक्त तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या लोकांनाच दाखवायचा, असेल तर सेटिंग्जमध्ये जाऊन आणि Everyone ऐवजी My Contact वर क्लिक करावे लागेल.
  7. आणि जर तुमचा प्रोफाईल फोटो कुणीच पाहू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर त्यात तुम्हाला No One चा पर्याय निवडावा लागेल. असे केल्यामुळे तुमचा प्रोफाईल फोटो कुणीही पाहू शकणार नाही.