अकरावी प्रवेशाची पहिली कट ऑफ लिस्ट जाहीर


मुंबई – अकरावी प्रवेशाची पहिली कट ऑफ लिस्ट जाहीर झाली असली तरी मुंबईतील नामांकित कॉलेज कट ऑफ नव्वदी पार गेली आहे. कॉलेज कट ऑफमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत फारसा फरक पडलेला नाही. अर्जाचा भाग दोन 40 हजार विद्यार्थ्यांनी न भरल्यामुळे पहिल्या कट ऑफ लिस्टमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत फारसा फरक पडलेला नाही. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत सामील करून घेतल्यास कट ऑफमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई विभागात पहिल्या कट ऑफ लिस्टमध्ये 1,17,883 विद्यार्थ्यांना कॉलेज प्राप्त झाले आहे. मुंबई विभागात एकूण अर्ज भरल्यापैकी 61.69 टक्के विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहेत. मुंबई विभागात 48,788 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. मुंबईत सायन्स 40,354, कॉमर्स 65028, आर्टस् 11768 शाखेसाठी विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत कॉलेज मिळाले आहेत.