पर्यावरणपूरक उद्योगास अनुदान देण्यासंदर्भात अभ्यास करण्यात येईल – संजय बनसोडे


मुंबई : राज्य शासनाने महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी केली असून येत्या काळात सिंगल यूज प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर करुन विविध प्रकारचे साहित्य आणि इतर उत्पादन निर्मिती करणाऱ्या उद्योगासंदर्भातील प्रस्तावाबाबतचा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबतचा अभ्यास करण्यात येईल असे पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

पर्यावरणपूरक उद्योगास शासन स्तरावर अनुदान मिळण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या अधिकाऱ्यांसह सुभाष मालपाणी उपस्थित होते.

राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, प्लॅस्टिकचा वापर करुन विविध पूरक उद्योगधंदे सुरु करता येत असले तरी याबाबत पुरेसा अभ्यास विभागामार्फत करण्यात येईल. मालपाणी यांनी यावेळी राज्य शासनाच्या विविध विभागांचा निधी मिळण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र मिळविणे कठीण असल्याचे नमूद केले.