व्हिडीओ व्हायरल; पाणीपुरी चवीने खाणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी


गुवाहाटी – आपल्यापैकी अनेकांचा पाणीपुरी हा आवडीचा पदार्थ असून, हा एक असा पदार्थ आहे जो देशातील वेगवेगळ्या भागात वेगवगेळ्या नावाने विकला जातो. सगळीकडे आणि सगळ्या वयोगटातील त्याचा चाहता वर्ग आहे. लोकांना हॉटेलपेक्षाही हातगाडीवर अथवा स्टॉल्सवर जाऊन पाणी पुरी खायला आवडते. सध्या अशाच एका पाणीपुरी स्टॉलवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. काही लोक माणुसकीच्या नावाखाली कलंक असल्याचे हा व्हिडीओ बघून म्हटले तर वावग ठरणार नाही. एका पाणीपुरी विकणाऱ्याने पाणी पुरीच्या पाण्यामध्ये केल्याचा हा धक्कादायक व्हिडीओ आहे. या व्हिडीओवर नेटीझन्सनी संताप व्यक्त केला आहे.


या व्हायरल व्हिडीओमध्ये, पाणीपुरी हा विकणारा व्यक्ती मग मध्ये लघवी करतो आणि नंतर तेच मग वापरून लोकांना पाणी पुरी देत असल्याचे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई केली. या विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. गुवाहाटीमधील आठगाव भागातील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ ट्विटर युझर्स मामून खान यांनी पोस्ट केला आहे.

आतापर्यंत हजारों लोकांनी अवघ्या १० सेकंदाचा हा व्हिडीओ पाहिला आहे. तर अनेकांनी हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी रीट्विटही केला आहे. अनेकांनी यावर कमेंटही केली आहे. अनेक जण कमेंट्स सेक्शनमध्ये आपला राग व्यक्त करत आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंतीही केली जात आहे.