खासदार छत्रपती उदयनराजे यांना करोना

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर पुण्याच्या रुबी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. उदयनराजे यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले गेले आहे. उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे यांना करोनाची लागण अगोदरच झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने उदयनराजे दिल्लीचे पावसाळी अधिवेशन सोडून पुण्याला परतले होते.

मिळालेल्या माहितीनुसार चार दिवसानंतर उदयनराजे यांच्यातही करोनाची लक्षणे दिसू लागली तेव्हा त्यांनाही रुग्णालयात दाखल केले गेले. सोशल मीडियावर उदयनराजे यांना करोना झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. करोना काळात दुकाने सुरु करावीत आणि जनतेची कुठलीही अडवणूक होऊ नये यासाठी उदयनराजे यांनी ‘भीक मांगो’ आंदोलन केले होते. त्यांनी करोना काळात प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेला विरोध केला होता.