मुंबई :- सन २०२१-२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ४७ क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने Sector Skill Council, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने राज्यात Skill Competition -21 चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. तरी इच्छुक उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांनी केले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा २०२१ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
यातील पहिल्या टप्यातील जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक 17 ऑगस्ट 2021 ते 18 ऑगस्ट 2021 रोजी होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरीता दिनांक 15 ऑगस्ट 2021 पर्यत या लिंकवर नोंदणी करून जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी सहभागी व्हावे अधिक माहितीकरिता या संकेतस्थळास किंवा येथे भेट द्यावी.