एएआय भरती अंतर्गत भरली जाणार एकूण २९ पदे; १ लाखांपेक्षा जास्त पगार


नवी दिल्ली – भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात एएआयने वरिष्ठ सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एएआयच्या अधिकृत वेबसाइटवर aai.aero वर भेट देऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार एएआय भरती २०२१ साठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२१ आहे. एएआय भर्ती २०२१ अंतर्गत एकूण २९ पदे भरली जाणार आहेत.

अर्ज करण्याची प्रारंभ तारीख: २९ जुलै २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑगस्ट २०२१

एएआय भरतीच्या जागांचा तपशील

  • वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स) – १४ पदे
  • वरिष्ठ सहाय्यक (वित्त) – ०६ पदे
  • वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) – ०९ पदे

एएआय भरतीसाठी पात्रता निकष

  • वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स) – एलएमव्ही (LMV) परवानासह पदवीधर. उमेदवारांनी व्यवस्थापनाचा डिप्लोमा देखील केलाला हवा.
  • वरिष्ठ सहाय्यक (वित्त) – उमेदवारांनी ०३ ते ०६ महिन्यांच्या संगणक प्रशिक्षण कोर्सच्या प्रमाणपत्रासह B.Com असणे आवश्यक आहे.
  • वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स)- उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स/ दूरसंचार/ रेडिओ अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केलेला असावा.

एएआय भरतीसाठी वयोमर्यादा

  • वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स) – उमेदवारांची वयोमर्यादा ३० जून २०२१ रोजी ५० वर्षे असावे.
  • वरिष्ठ सहाय्यक (वित्त) – उमेदवारांची वयोमर्यादा ३० जून २०२१ रोजी ५० वर्षे असावे.
  • वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) – ३० जून २०२१ रोजी ५० वर्षे असावे.

एएआय भरतीसाठी पगार

  • वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स) – रु. ३६,००० ते रु. १,१०,०००
  • वरिष्ठ सहाय्यक (वित्त) – रु. ३६,००० ते रु. १,१०,०००
  • वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) – रु. ३६,००० ते रु. १,१०,०००