15 ऑगस्टपासून रात्री 10 पर्यंत सुरू रहाणार मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स


मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर होणार असून हॉटेलला रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून होणार आहे.

पण मॉलमधील रेस्टॉरंट आणि थिएटर्स मात्र बंद राहणार असल्याची माहिती आहे. तसेच ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांना मॉलमध्ये प्रवेश मिळणार असल्याचे देखील वृत्त आहे. सध्या रेल्वे पाससाठी जो क्यू आर कोड वापरला जात आहे, तोच मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि इतर ठिकाणी वापरला जाण्याची शक्यता देखील आहे.

जे विवाह सोहळे खुल्या जागेत होणार त्यांना 200 लोकांची मर्यादा आणि हॉलमधील एकूण जागेच्या 50 टक्के मर्यादा परवानगी दिली आहे. नियमांचे पालन करणार नाही त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे

खाजगी कार्यालयात एकाचवेळी गर्दी करण्यापेक्षा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिफ्टमध्ये काम करता येईल. खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे दोन डोस झाले आहे, त्यांचे कार्यालय शंभर टक्के क्षमतेने सुरू राहील.

पुढील आदेश येईपर्यंत सिनेमागृह आणि नाट्यगृह आणि धार्मिक स्थळे बंद असणार आहे. शॉपिंग मॉल 10 वाजेपर्यंत सुरु राहतील, मात्र त्या ठिकाणी जाणारे आहेत त्यांचे दोन डोस पूर्ण झालेले असावेत. कार्यालयात शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्रथम लसीकरण देण्याची परवानगी देण्यात आली आहे.