देशात सापडले करोनाचे नवे व्हेरीयंट ‘इटा’

द. कर्नाटकातील मंगळूर येथे करोनाचा ‘इटा’ हा नवा स्ट्रेन सापडला असल्याचे समजते. येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार महिन्यापूर्वी दुबई येथून परतलेल्या एका व्यक्ती मध्ये गुरुवारी करोनाचा हा स्ट्रेन आढळला. कर्नाटक कोविड १९ जिनोम सिक्वेन्सिंग कमिटीचे अध्यक्ष डॉ. रवी यांनी या संदर्भात माहिती दिली.

डॉ. रवी म्हणाले कोविड १९ चे इटा व्हेरीयंट देशात नवे नाही. एप्रिल २०२० मध्ये तपासल्या गेलेल्या नमुन्यापैकी दोन नमुन्यात हे व्हेरीयंट सापडले होते. या व्हेरीयंट मध्ये करोनाच्या अल्फा, बीटा, गामा मध्ये एन ५०१ वाय मिळणारे म्युटेशन नाही तर ई ४८३ म्युटेशन आहे. हा घातक ठरू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने इटा सर्व व्हेरीयंट मध्ये वेगळाच असल्याचे म्हटले आहे. हा अधिक संक्रामक असू शकतो असा इशाराही दिला गेला आहे.

ब्रिटन मध्ये करोना डेल्टा व्हेरीयंटने कहर केला आहे पण तेथेही इटा व्हेरीयंट वर लक्ष ठेवले जात आहे. वैज्ञानिकांची एक संपूर्ण तुकडी या व्हायरसचे रूप समजून घेण्यासाठी कार्यरत असून या व्हेरीयंट चे जगात ५६ रुग्ण सापडले आहेत.