3000 हजार वर्षांपुर्वीच्या ‘ममी’ची आश्चर्यकारक माहिती आली समोर


मिस्त्रच्या पिरामिड आणि ममीबद्दल जाणून घेण्यासाठी जगामध्ये सर्वांनाच रूची आहे.  अनेक वेळा जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टींचा शोध लागला आहे. या ममीबद्दल काहीसा असाच आश्चर्यचकित शोध मॉस्कोतील कुर्चतोव इंस्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी लावला आहे.

वैज्ञानिकांनी प्राचीन मिस्त्रच्या तीन ममींच्या केसांवर संशोधन केले. ही केसं 3000 वर्षांपासून सुरक्षित आहे. रशियाच्या वैज्ञानिकांनी ही केंस अनेक वर्ष कशी सुरक्षित राहिली याबद्दल शोध घेतला असता, अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. संशोधकांनी दावा केला आहे की, एका खास प्रकारच्या मलमामुळे ममीचे केस 3000 वर्ष सुरक्षित राहिली आहेत. ममीच्या केसांवर देवदारचे गोंद लावण्यात आले होते. त्यामध्ये अनेक प्राकृतिक रसायनांचा समावेश होता.

केसांच्या रहस्याबद्दल जाणून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी इन्फ्रोरेड स्पेक्ट्रमचा वापर केला. त्याने माहिती मिळाली की, केसांवर लावण्यात आलेल्या मलममध्ये बीफची चरबी, पिस्त्याचे तेल, मधमाक्ष्यांपासून तयार करण्यात आलेले मेण यांचा समावेश होता. रशियाच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, ममीला तयार करण्यासाठी दोन प्रकारचा लेप तयार करण्यात येत असे. यामधील एक शरीरावर तर एक केसांवर लावला जात असे. संशोधनासाठी ज्या ममीजचा वापर करण्यात आला आहे, त्यांना सध्या मॉस्कोच्या पुशाकिन स्टेट म्युजियममध्ये ठेवण्यात आले आहे.

माहितीसाठी की, प्राचीन मिस्त्रमध्ये शवांना ममी बनवण्यासाठी त्यांच्या आतील भागांना काढून त्यावर मीठ लावले जात असे. त्यानंतर शरीराला खास प्रकारचा लेप लावला जात असे. त्यानंतर संपुर्ण शरीराला कापडाने गुंडळले जात असे. कापडाने गुंडळल्यानंतर शरीराला पेटीत बंदकरून रेतीमध्ये दफन केले जात असे. जेणेकरून ममी हजारो वर्ष सुरक्षित राहिल.

Leave a Comment