अंगावर शहारे आणणारा ‘भुज’चा दुसरा ट्रेलर रिलीज


काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगणच्या ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. हा ट्रेलर चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरल्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे.

टी-सीरिजच्या युट्यूब अकाऊंवरून चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. दुसऱ्या ट्रेलरमध्ये ही अजयचे दमदार डायलॉग आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण, सगळ्यात जास्त चर्चा ही अजयच्या एका डायलॉगची होते आहे. हम उस महान छत्रपती शिवाजी की औलाद हैं, जिन्होंने मुगलों को घुटनों पर ला दिया था और अपने खून से हिंदुस्तान का इतिहास लिखा था। या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ऐकल्यामुळे प्रत्येकाच्या अंगावर शहारे नक्कीच येतील.

‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात भारतीय हवाई दलातील शूर अधिकारी विजय कर्णिक यांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपटात भारत-पाक युद्धातील सत्य घटनांवर आधारित आहे. भुजवर पाकिस्तानने हल्ला केला होता. त्यावेळी विजय कर्णिक हे भुजच्या हवाई तळाचे प्रमुख होते. पाकिस्तानी सेनेने केलेल्या हल्ल्यानंतर हा विमानतळ नष्ट झाले होते. त्यानंतर विमानतळाच्या जवळ असलेल्या माधापार गावातील ३०० महिलांच्या मदतीने विजय कर्णिक यांनी विमानतळ पुन्हा एकदा उभारले होते.

या चित्रपटात ही कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यदिना आधीच म्हणजे १३ ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजयसोबत सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.