टोकियो : भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करत भारतीय संघाने पहिल्यांदाच सेमीफायनल गाठली आहे. भारतीय महिला संघाने ग्रुप स्टेजमधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा विक्रम पहिल्यांदाच केला आहे. गुरजीत कौरच्या एकमेव गोलच्या बळावर या सामन्यात हा ऐतिहासिक विजय मिळवला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 22 व्या मिनिटाला गुरजीतने एक गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली.
Tokyo Olympics: भारताच्या लेकींनी रचला इतिहास; ऑस्ट्रेलियाला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश
भारताची गोलकिपर सविताने या सामन्यात जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. ऑस्ट्रेलियाचे मजबूत आक्रमण सविताने अनेकदा परतवून लावले. विशेष म्हणजे तिने पेनाल्टी क़ॉर्नरवर केलेला बचाव हा वाखाणण्याजोगाच होता. तिच्या या कामगिरीमुळे सोशल मीडियावर तिचे चांगलेच कौतुक होत आहे.