तुम्ही तुमच्या आयुष्यातील एवढा वेळ घालवता बाथरूममध्ये ?


बाथरुममध्ये गेल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना नवीन आयडिया येतात किंवा अनेकांना बाथरुममध्येच हवी असलेली शांतता मिळते. पण काहीजणांना हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी एका सर्वेक्षणातून हे बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे. यासाठी इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हा दावा करण्यात आला आहे. हे सर्वेक्षण बाथरूमवर करण्यात आले होते.

एक सामान्य माणूस त्याच्या आयुष्यातील किती वेळ टॉयलेट किंवा बाथरूममध्ये घालवतो, याचा विचार तुम्ही याआधी कधी केला आहे का? पण आता तुम्हाला याबाबत जास्त विचार करण्याची गरज नाही, कारण या प्रश्नाचे उत्तर या सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे. सरासरी ४१६ दिवस बाथरूममध्ये एका सामान्य माणूस त्याच्या आयुष्यातील घालवतो.

स्टडीफाईंड.ओआरजीने (studyfinds.org) दिलेल्या वृत्तानुसार, यु.के. होम-गुड्स आऊटलेट बी अॅण्ड क्यू (U.K. home-goods outlet B&Q) कडून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साधारण २ हजार लोकांना यात सहभागी करून घेण्यात आले होते. लोकांना एक बेस्ट बाथरूम तयार करून देणे या सर्वेक्षणा मागचा उद्देश होता. यानुसार, पुरूष ३७३ दिवस म्हणजे दिवसाला २३ मिनिटे आणि महिला ४५६ दिवस म्हणजे दिवसातील २९ मिनिटे बाथरूममध्ये घालवतात.

या सर्वेक्षणात एक हैराण करणारी बाब देखील समोर आली आहे. ती अशी की पर्सनल बाथरूम ज्या लोकांकडे असते ते लोक त्यांचे बाथरूम इतरांसोबत शेअर करत नाहीत. त्यानुसार १० पैकी ७ लोक हे त्यांचे बाथरूम दुसऱ्यांसोबत शेअर केल्यावर निराश होतात. सर्वेक्षणामध्ये सहभागी १७ टक्के लोकांचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या बाथरूममध्ये ते दुसऱ्यांना बघू शकत नाहीत.

लोकांना बाथरूमध्ये सर्वात जास्त कशाचा राग येतो? याबाबत एक तृतियांश लोकांनी हे सांगितले की, त्यांना टॉयलेट पेपर संपल्यावर फार राग येतो. तर याबाबत २०० लोकांचे असे म्हणणे आहे की, बाथरूमच्या नालीत त्यांना केस दिसल्यास राग येतो. तर २९ टक्के महिलांनी सांगितले की, बॉयफ्रेन्ड किंवा पती त्यांचे बाथरूम घाणेरडे करण्याला जबाबदार आहेत. याचा त्यांना राग येतो.

या सर्वेक्षणातून एक विशेष बाब अशी समोर आली की, बाथरूमचा वापर काही लोक पळवाट म्हणूनही करतात. त्यांना जेव्हा कुणाला टाळायचे असते ते तेव्हा बाथरूममध्ये जाऊन लपतात. ६ पैकी एका व्यक्तीने सांगितले की, त्यांना असे करून फार जास्त शांती मिळते. या सर्वेक्षणातून अशी आणखी आश्चर्यकारक बाब समोर आली. ती म्हणजे काही लोकांनी हे मान्य केले की, या छोट्याशा बाथरूममध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील काही सर्वात चांगले क्षण अनुभवले. १० टक्के लोकांनी सांगितले की, स्वत:शी बोलण्याची त्यांना येथेच संधी मिळाली. तर १० टक्के लोक म्हणाले की, येथे त्यांनी लोकांशी वाद घातला. ८ टक्के लोक म्हणाले की, त्यांनी त्यांच्या पार्टनरसोबत येथे वेळ चांगला वेळ घालवला. तसेच १.४ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी बाथरूममध्ये बाळाला जन्म दिला.

Leave a Comment