महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा उत्तरार्ध 1 ऑगस्टपासून


नवी दिल्ली : महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा उत्तरार्ध 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे. पूर्वार्धामध्ये नामवंत 44 वक्त्यांची व्याख्याने झालेली आहेत. या व्याख्यानमालेचे नेटकऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत येणाऱ्या दिल्लीस्थित महाराष्ट्र परिचय केंद्राचे हे 60 वे वर्ष आहे. यानिम‍ित्त हीरक महोत्सवी व्याख्यानमालेची सुरूवात 19 मार्च 2021 पासून करण्यात आली होती. आतापर्यंत या व्याख्यानमालेमध्ये एकूण नावाजलेल्या 44 वक्त्यांनी विविध विषयांवर व्याख्याने दिलेली आहेत.

हीरक महोत्सवी व्याख्यानमालेतील प्रथम व्याख्यान ज्येष्ठ पत्रकार, डॉ. विजय चोरमारे यांनी ‘गेल्या 60 वर्षातील महाराष्ट्राचे समाजकारण व राजकारण ’ या विषयावर दिले होते. यासह या व्याख्यानमालेत माजी कुलगुरू आणि माजी उच्च शिक्षण संचालक डॉ एस.एन. पठाण , राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार श्री कुमार केतकर, साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार (गोवा) श्री प्रभाकर ढगे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, कृषीतज्‍ज्ञ डॉ. बुधाजी मुळीक, सुप्रसिध्द शाहीर संभाजी भगत, विचारवंत व राज्यशास्त्रज्ञ डॉ. अशोक चौसाळकर, इतिहास संशोधक श्री इंद्रजित सावंत, दै. सकाळ चे दिल्लीतील संपादक अंनत बागाईतकर , मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मेधा कुळकर्णी, प्रसिद्ध कवी, लेखक अशोक नायगावकर, साहित्यिक श्रीकांत देशमुख, विचारवंत व कांदबरीकार श्री संजय सोनवणी, वरिष्ठ पत्रकार व लेखक सचिन परब, तुषार गांधी, दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, संतसाहित्य व लोकवाङ् मय याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, ज्येष्ठ पत्रकार व माध्यम तज्ज्ञ श्री राजा माने, प्रसिध्द वक्ते व इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे, साहित्यिक, पक्षीतज्ज्ञ, वृक्ष अभ्यासक मारूती चितमपल्ली, विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे , ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जून डांगळे , ज्येष्ठ पत्रकार व लेखक विजय नाईक, ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी, सामाजिक कार्यकर्ते संजय नहार, ज्यष्ठ राजकीय नेते उल्हास पवार , सकाळ माध्यम समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार , मराठी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे डॉ. रणधीर शिंदे, प्राध्यापक तथा लेखक डॉ. गिरीश मोरे, प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, निवृत्त सनदी अधिकारी तथा लेखक लक्ष्मीकांत देशमुख, प्रसिद्ध निवेदिका क्षिप्रा मानकर , माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक व तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार, नामवंत इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, चित्रपट अभ्यासक प्रा. डॉ. कविता गगरानी, माजी एयर मार्शल अजित भोसले यांची आतापर्यंत व्याख्याने झालेली आहेत.

वक्त्यांनी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील प्रगतीच्या वाटचालीचा आलेख मांडला तसेच भविष्यात उचलावी लागणारी पावले यावरही भाष्य केले. ही व्याख्यानमाला ऑनलाईन माध्यमाने झाली . नेटकऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या व्याख्यानमालेचे कौतुक केले.

या व्याख्यानमालेत झालेली सर्व व्याख्याने आजही आमच्या सर्व समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. ही झालेली व्याख्याने परिचय केंद्राचे ‍मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर पाहता येईल तसेच फेसबुक https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युट्यूब चॅनेल वर पाहता येतील.