पश्चिम रेल्वेची स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत ग्रुप सी मधील पदांसाठी भरती; ८१ हजारापर्यंत पगार!


विविध पदांसाठी भारतीय रेल्वेमध्ये भरती होत असते. भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट सेल द्वारे नेहमी लोकांपर्यंत याचे अधिकृत नोटिफिकेशन, माहिती पोहचवली जाते. भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट सेल, पश्चिम रेल्वेने स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत ग्रुप सी मधील पदांवर भरतीची घोषणा केली आहे. ४ ऑगस्ट २०२१ पासून इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

ऑनलाइन स्वरुपात अर्ज rrc-wr.com या वेबसाईटवर करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२१ आहे. त्यामुळे ३ सप्टेंबर किंवा त्या आधी उमेदवारांनी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करतांना लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया आणि पगाराविषयी याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

रेल्वे रिक्रुटमेंट सेलद्वारे जाहीर केलेल्या नोटिफिकेशन नुसार मॅट्रिक लेवल ४ च्या उमेदवारांना २५,५०० पासून ८१,१०० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तर मॅट्रिक लेवल ५ च्या उमेदवारांना २९,२०० पासून ते ९२,३०० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. मॅट्रिक लेवल २ च्या उमेदवारांना १९,९०० पासून ६३,२०० रुपयांपर्यंत तर मॅट्रिक लेवल ३ च्या उमेदवारांना २१,७०० ते ६९,१०० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

उमेदवारांना लेवल ४ आणि ५ साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑलम्पिक खेळात (सिनीअर वर्ग) देशाचे प्रतिनिधित्व केलेले असायला हवे किंवा मग विश्व कप (जुनिअर, युवा, सिनिअर वर्ग) किंवा विश्व चॅम्पियनशिप (जुनिअर,सिनिअर श्रेणी) किंवा आशियाई खेळात (सिनिअर वर्ग) किंवा राष्ट्रमंडळामध्ये कमीत कमी तिसरा स्थान प्राप्त केलेले असावे. शैक्षणिक पात्रतेची अधिक आणि पूर्ण माहिती मिळवण्यासाठी वेबसाईटवरील अधिकृत नोटिफिकेशन पहा.

ट्रायल, उपलब्ध खेळ, शैक्षणिक पात्रता आणि मुल्यांकनावर यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल. ट्रायलमध्ये फिट असलेले, पास होणारे उमदेवारच पुढच्या फेरीसाठी निवडले जातील. ३ सप्टेंबर किंवा त्या आधी ऑनलाइन स्वरुपात उमेदवारांनी अर्ज करावा. अधिकृत नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून अर्ज करावा.