जर आसाम पोलीस परत आले तर आम्ही त्या सर्वांना मारुन टाकू; मिझोरामच्या खासदाराची धमकी


नवी दिल्ली – आसाम-मिझोरम दरम्यान सुरु असलेला सीमा विवाद संपण्याचे नावच दिसत नाही. आसाम पोलिसांनी आता मिझोरामचे राज्यसभेचे खासदार के वनलालवेना यांची चौकशी करण्यासाठी दिल्ली येथे एक पथक पाठविण्याची तयारी केली आहे. आसाम पोलिसांवर सीमेजवळ थांबून हल्ला केल्याचा आरोप मिझोरमच्या खासदाराने केला होता. यासह त्यांनी आसाम पोलिसांना जिवे मारण्याची धमकीही दिली. दोन्ही राज्यांच्या पोलीस दलांमध्ये झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलातील सहा जण आणि एक नागरीक ठार झाला होता.

या हिंसाचाराचा कट आसाम पोलिसांनी रचला होता आणि मिझोरमचे खासदार यात सामील असल्याचे सांगितले होते. यानंतर खासदार वनलालवेना यांनी आसाम पोलिसांना जिवे मारण्याची धमकी दिली. वनलालवेना संसदेबाहेर बोलताना म्हणाले होते की, आमच्या भागात २०० हून अधिक पोलिसांनी प्रवेश केला आणि आमच्या पोलिसांना त्यांच्या जागेवरून मागे ढकलले. आम्ही गोळीबार करण्यापूर्वी त्यांनी गोळीबार करण्याचे आदेश दिले. ते भाग्यवान होते की आम्ही त्या सर्वांना मारले नाही. जर ते परत आले तर आम्ही त्या सर्वांना मारुन टाकू.

बुधवारी आसामचे वरिष्ठ अधिकारी जी.पी. सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की त्यांची टीम राज्यसभेचे खासदार के. वनलालवेना यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनाची आणि त्यांच्या घटनेमागील षडयंत्र संबंधित कारवाईची योजना आखत आहे. या कटात त्याच्या सक्रिय भूमिकेचे संकेत आहेत. कछर जिल्ह्यातील इनर लाइन रिझर्व फॉरेस्ट भागात सोमवारी सकाळी सुरू झालेल्या हिंसाचारात ४५ लोक जखमी झाले. हिंसाचारानंतर दोन्ही राज्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. अशांत भागात शांतता राखण्यासाठी निमलष्करी दले तैनात करावी लागली.