खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय


मुंबई: महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर खासगी शाळांच्या 15 टक्के फी कपातीचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 15 टक्के फी माफीबद्दल लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याची ही माहिती आहे.

शाळा कोरोना काळात बंद असल्यामुळे खासगी शाळांनी फीमध्ये 15 टक्के कपात करण्याबाबत सरकारकडून मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अध्यादेश काढला जाईल. खासगी शाळांचीफी ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. पण राज्य सरकारच्या आदेशानुसार कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे या कालावधी फी कपातीचा अधिकार राज्य सरकारकडे घेण्याचे या अध्यादेशाद्वारे प्रस्तावित असल्याची माहिती आहे.