पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या सतर्कतेमुळे वाचले आंबेमाची येथील ग्रामस्थांचे प्राण


अलिबाग : रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर येथे पूर आल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसापूर्वी दरड कोसळल्याने पोलादपूर तालुक्यात आंबेमाची या गावाचा संपर्क तुटला होता. याची तातडीने गंभीर दखल घेऊन रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सतर्कता दाखवीत एसडीआरएफच्या दोन तुकड्या सोबत घेऊन त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली. अन् आंबेमाची येथील 89 लोकांना रेस्क्यू टिम सुखरूप बाहेर काढण्यात यशस्वी ठरली.

या ग्रामस्थांना नानेघोळ येथील मंदिराच्या सभागृहात सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आले आहे. पालकमंत्री आदिती तटकरे या महाड, पोलादपूर तालुक्यावर आलेल्या या संकटात रात्रंदिवस स्वतः जातीने उपस्थित राहून येथील मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत.