ऑगस्टमध्ये तब्बल १५ दिवस बंद राहणार बँका


जर बँकशी संबंधित ऑगस्ट महिन्यात तुमची काही महत्त्वाची काम असतील तर ती जुलै महिन्याच पूर्ण करा, कारण ऑगस्ट महिना हा बंपर हॉलिडे महिना आहे. त्यामुळे बँकेचे काम पुढे ढकलले तर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. कारण ऑगस्ट महिन्यात विविध सणांमुळे तब्बल १५ सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. या सुट्ट्यांमुळे बँकेच्या कामकाजावरही परिणाम होणार आहे. ऑगस्ट महिन्यात रविवार, शनिवारची सुट्टी आणि सार्वजनिक सुट्ट्या मिळून एकूण तब्बल १५ दिवस बँका बंद असणार आहे.

बँक सुट्ट्यांची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात शनिवार आणि रविवारच्या आठवड्याच्या सुट्ट्या मिळून एकूण सात सुट्ट्या असतील. तसेच इतर काही सणांच्या सुट्ट्याही बँकांना मिळणार आहे. पण प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात.

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी

  • १ ऑगस्ट – रविवार
  • ८ ऑगस्ट – रविवार
  • १३ ऑगस्ट -पॅट्रिएट डे (इंफाळमध्ये बँका बंद)
  • १४ ऑगस्ट – दुसरा शनिवार
  • १५ ऑगस्ट – रविवार
  • १६ ऑगस्ट – पारशी नववर्ष
  • १९ ऑगस्ट – मोहरम
  • २० ऑगस्ट – फर्स्ट ओणम
  • २१ ऑगस्ट- थिरुवोणम – (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)
  • २२ ऑगस्ट – रविवार
  • २३ ऑगस्ट – श्री नारायण गुरू जयंत (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)
  • २८ ऑगस्ट – चौथा शनिवार
  • २९ ऑगस्ट – रविवार
  • ३० ऑगस्ट- जन्माष्टमी
  • ३१ ऑगस्ट – गोपाळ काला

तुम्हाला ऑगस्ट महिन्यात तब्बल दोन वेळा लाँग विकेंड मिळणार आहे. पहिला म्हणजे १९ ते २३ ऑगस्ट आणि दुसरा २८ ते ३१ ऑगस्टदरम्यान आहे. यामध्ये सलग ५ आणि ४ दिवस सुट्ट्या मिळणार आहेत.

दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जारी केली जाते. तुम्ही या सुट्ट्यांची यादी वेबसाइटवर पाहू शकता. या वेबसाईटवर तुम्हाला प्रत्येक महिन्यात कोणत्या राज्यात बँकांना किती सुट्ट्या असतात याची माहिती दिलेली असते.