व्हायरल सत्य; गावातील महिलांची पुरुषाविना होते गर्भधारणा


नेरोबी – गेल्या 29 वर्षांपासून आफ्रीकेच्या एका गावात पुरुषांना राहण्यास बंदी असूनही येथील महिलांना गर्भधारणा होते. आफ्रीकेच्या यूमोजा गावासंबंधी विविध गोष्टी अनेक दिवसांपासून व्हायरल झालेल्या आहेत. पण आम्ही आज तुम्हाला या गावासंदर्भात सत्यता सांगणार आहोत.

पुरुषांना आफ्रीकेच्या घनदाट जंगलामध्ये वसलेल्या या गावाच्या आसपास फिरण्यासही बंदी आहे. ही बाब पूर्णतः सत्य असून ब्रिटीश जवानांनी 1990 मध्ये 15 महिलांवर बलात्कार केला होता. नंतर हे गाव महिलांच्या निवासासाठी तयार करण्यात आले होते. तेव्हापासून येथे बलात्कार, बाल विवाह, घरेलू हिंसा आणि खतना यांसारख्या हिंसा पीडित महिला वास्तव्यासाठी येत आहेत. त्यामुळेच या गावात पुरुषांना येण्यास बंदी घातली आहे. आफ्रीकेतील हे सिंगल-सेक्स कम्युनिटी असणारे एकमेव गाव आहे.

पुरुषांची लोकसंख्याच या गावात नाही तर मग या महिला आपोआप गर्भवती कसे काय होतात? हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो. यामागे दोन तर्क आहेत. पहिला असा की, येथे राहण्यासाठी आलेल्या पीडित महिला अगोदरच गर्भवती होत्या, ज्यांच्याविषयी ऐकून लोकांनी त्या आपोआप प्रेग्नंट होण्याची अफवा उडवली.

तर दुसरा तर्क असा आहे की, पुरुषांना या गावात बंदी असेल पण महिलांना दुसऱ्या गावात आणि शहरांमध्ये जाण्याची पाबंदी नसल्यामुळे दुसऱ्या गावातील आवडत्या पुरूषाबरोबर संबंध ठेवून गरोदर होतात. पण हे अद्यापही खरे आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. या महिलांना चोरून आजुबाजूच्या गावातील लोक दुसऱ्या गावात घेऊन जात असल्याचे बोलत आहेत. 15 महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या या छोट्याशा गावाचा आता विस्तार झाला आहे. मिडीया रिपोर्ट्सनुसार आता या गावात 250 महिला राहत आहेत. यातील अनेक महिलांनी मुलांना जन्म दिला आहे.

पर्यटक चर्चेचा विषय ठरलेल्या या गावात भेट देत आहेत. महिलांना या गावात प्रायमरी स्कूल, कल्चरल सेंटर आणि नॅशनल पार्क उभारले आहे. येथे त्यांनी पर्यटनासाठी मोहीम सुरू केली आहे. अनेक पर्यटक याठिकाणी भेट देतात. त्यासाठी पर्यटकांकडून शुल्क आकारले जात आहे. पर्यटनातून येणारा पैसा गावाच्या विकासासाठी खर्च केला जातो. पण येथे मुक्कामी थांबण्यासाठी पर्यटकांना मनाई आहे.

Leave a Comment