सरकारी कार्यालयात मोबाईल वापरालाही नियमावली, असे आहेत नियम


मुंबई : राज्य सरकारने शासकीय कार्यालयात ड्रेस कोड कसा असावा याचे नियम जारी केल्यानंतर, आता मोबाईलचा वापर कसा करायचा या संदर्भात परिपत्रक काढून नियम जारी केले आहेत. शासकीय कार्यालयात मोबाईल वापरताना अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाही. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगत हे परिपत्रक काढण्यात आले आहे

असे आहेत नियम-

  • कार्यालयीन कामासाठी कार्यालयात असलेला दूरध्वनीचा (लँडलाईन) वापर करावा
  • मोबाईलवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा आणि आपल्या बाजूला इतरही उपस्थित आहे याचाही विचार करावा
  • मोबाईलवर बोलताना संविधानिक भाषेचा वापर करावा
  • मोबाईलवर बोलत असताना लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॉल्सला तात्काळ उत्तर द्यावा
  • अत्यावश्यक वैयक्तिक मोबाईल कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाईल सायलंट मोड वरती ठेवण्यात यावा
  • कार्यालयीन कामासाठी दौऱ्यावरती असाल तर मोबाईल बंद ठेवू नये