आयकर विभागाचे ‘दैनिक भास्कर समूहा’च्या कार्यालयांवर छापे


नवी दिल्ली – आज आयकर विभागाने दैनिक भास्कर माध्यम समूहाच्या विविध कार्यालयांवर छापेमारी केली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार आयकर विभागाच्या पथकांनी दैनिक भास्कर समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर छापे टाकले. या कार्यालयांची झाडाझडती घेतली जात आहे. दैनिक भास्कर समूह हा देशातील प्रसिद्ध माध्यम समूहांपैकी एक आहे.

आयकर विभागाकडून ही कारवाई कर चोरी प्रकरणात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाचाच महत्त्वाचा भाग असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, भास्कर समूहाच्या कार्यालयांवर छापेमारी केली जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.