या तरुणीने फेकून दिलेल्या १५०० मास्कपासून तयार केला वेडिंग गाऊन


कोरोनाकाळात मास्क, ग्लोव्हज, पीपीई किट्सच्या कचऱ्यात वाढ झाली असून वापरलेले मास्क रस्त्याच्या कडेला, नद्यांपासून जंगलापर्यंत पडलेले दिसून येत आहेत. इंग्लंडमधील एका डिजाईनरने याचाच पुरेपूर फायदा घेत १५०० पांढऱ्या रंगाच्या डिस्पोजेबल मास्कपासून वेडिंग गाऊन तयार केला आहे.

हा वेडिंग गाऊन पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या ड्रेससाठी वेडिंग प्लानर वेबसाईट Hitched ने फंडिंग केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये जवळपास १०० मिलियनपेक्षा जास्त डिस्पोजेबल मास्क फेकले होते. टॉम सिल्वरवुडने हा अद्भूत ड्रेस डिजाईन केला आहे. या फ्लोअर लेंथ गाऊनला तयार करण्यासाठी त्यांनी जवळपास १ हजार ५०० मास्क एकत्र शिवले.

त्याचबरोबर कमरेच्या भागाजवळ हायलाईट करण्यासाठी डिस्पोजेबल प्लास्टिक पीपीई किटचा वापर केला आहे. मॉडेल जेमिमा हॅम्ब्रोने सेंट पॉल कॅथेड्रल येथे ड्रेस घालून फोटोशुट केल्यानंतर हे फोटो तुफान व्हायरल झाले. ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच फेसमा स्कपासून असा ड्रेस तयार करण्यात आला. इंग्लंडमध्ये कोरोना माहामारीनंतर लावण्यात आलेला लॉकडाऊन जवळपास २ वर्षांनी हटवला जात आहे.

तेथील स्थानिक लोक सध्याचे दिवस फ्रीडम डे च्या रूपात साजरा करत आहेत. तेथील कार्यंक्रमांसाठी असलेले निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. लग्न समारंभांसाठी जवळपास २०० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात Hitched च्या संपादकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा देशात लग्नसराई सुरू झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे.