रितेश देशमुखच्या आगामी अदृश्यमध्ये झळकणार मंजिरी फडणीस, पुष्कर जोग


अभिनेता रितेश देशमुख माऊली, लय भारी नंतर आता ‘अदृश्य’ या नव्या मराठी थ्रिलर चित्रपटाद्वारे रसिकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटामध्ये रितेशच्या सोबतीला अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री मंजिरी फडणीस असणार आहे. कबीर लाल या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. कबीर यांनीच रितेशचा पहिला चित्रपट ‘तुझे मेरी कसम’मध्ये सिनेमॅटोग्राफरची धुरा सांभाळली होती. त्यामुळे कबीर लाल आणि रितेश देखील 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. पण आता कबीर दिग्दर्शकाच्या भूमिकेत असणार आहेत.


दरम्यान ‘अदृश्य’ मध्ये पुष्कर जोग, मंजिरी फडणीस यांच्यासह सौरभ गोखले, अनंत जोग, अजय कुमार सिंह हे कलाकार झळकणार आहेत. साहिद लाल यांनी या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळली आहे, तर लवली वर्ल्ड एंटरटेनमेंट या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती अजय कुमार सिंह यांनी केली आहे. चित्रपटाच शूटिंग पूर्ण झाले असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दूसरीकडे लवकरच नागराज मंजुळे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 3 सीरीजमधील चित्रपटाचा रितेश देशमुख एक भाग असणार आहेत. यामध्ये शिवरायांच्या भूमिकेत रितेश झळकण्याची शक्यता आहे.