पावसाळ्यामध्ये असा असावा आहार


पावसाळा आणि गरमागरम चहा, भजी, बटाटेवडे यांचे समीकरण कसे पक्के जुळलेले आहे. पण आपल्या आवडीच्या खाद्यपदार्थांवर ताव मारतानाच आपल्या आरोग्याची काळजी घेणेही अगत्याचे आहे. पावसाळ्यामध्ये पचनशक्ती नैसर्गिक रित्याच मंदावलेली असते. त्यातून आपल्या खानपानावर आपण योग्य नियंत्रण ठेवले नाही तर डायरिया, उलट्या, क्वचित फूड पॉयझनिंग अश्या तक्रारी उद्भवू लागतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्या खानपानाकडे विशेष ध्यान देणे गरजेचे आहे.

पावसाळ्याच्या दिवसांतील दमट वातवरण निरनिराळ्या जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्याचमुळे या दिवसांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे आजार, सर्दी, खोकला, ताप इत्यादी व्याधी उद्भविण्याचे प्रमाण वाढते. केवळ लहान मुलेच नाही, तर मोठी माणसे देखील या व्याधींनी ग्रस्त होऊ लागतात. म्हणूनच आपल्या खानपानाची योग्य काळजी घेऊन साध्या आजारांपासून दूर राहणे शक्य होते. पावसाळ्यामध्ये काहीही खाण्यापिण्याच्या आधी आपले हात स्वच्छ धुतलेले असतील याची काळजी घ्यावी. तसेच आपण खात असलेल्या भाज्या, फळे ही स्वच्छ धुतलेली असावीत. त्यामुळे जीवाणूंपासून संक्रमण होण्याचा धोका पुष्कळ अंशी कमी होतो. पावसाळ्यामध्ये पिण्याचे पाणीही उकळून पिणे चांगले.

आपण खात असलेले खाद्यपदार्थ, प्यायचे पाणी नेहमी झाकून ठेवलेले असावे. तसेच अन्न, विशेषतः मांसाहारी पदार्थ व्यवस्थित शिजवून खाल्ले जावेत. तसेच बाहेर हातगाड्यांवर मिळणारे पदार्थ खाण्याचा मोह टाळावा. आपण खाणार असलेले अन्न ताजे शिजविलेले असावे. शिळ्या अन्नपदार्थांमध्ये जीवाणूंची वाढ झपाट्याने होत असते, त्यामुळे फ्रीजमध्ये देखील दोन दिवसांहून अधिक काळ ठेवलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे या दिवसांमध्ये तळलेले, पचण्यास जड पदार्थ खाणे टाळा

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment