हे अन्नपदार्थ पुन्हापुन्हा गरम करून खाणे आरोग्यास धोकादायक


आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये फिट राहणे ही जीवनावश्यक गरज आहे. त्यामुळे दिवसाकाठी जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा लोक निरनिराळे व्यायाम प्रकार अवलंबताना दिसत असतात. तसेच आपल्या आहाराच्या बाबतीतही आजकाल लोक जास्त जागरूक राहू लागले आहेत. बाहेर जेवण्यापेक्षा आजकाल लोक घरीच बनविलेले ताजे, साधे पण पोषक अन्न खाण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. पण कधी कामाच्या धांदलीमध्ये शिजविलेले अन्न गार होऊन जाते आणि मग ते अन्न पुन्हा मायक्रोवेव्ह किंवा गॅसवर गरम करून खाल्ले जाते. मात्र काही अन्नपदार्थ पुन्हा पुन्हा गरम केले गेले तर त्यांच्यातील पोषक तत्वे नष्ट होतातच, शिवाय परत परत गरम केले गलेले काही अन्नपदार्थ खाणे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.

पालकाची सुकी किंवा पातळ भाजी शरीरासाठी प्रथिनांचे उत्तम स्रोत आहे. पण हे भाजी जर अनेक वेळा गरम केली गेली तर त्यामध्ये असलेली नायट्रेट विषारी पदार्थांमध्ये रूपांतरित होतात, आणि ही परत परत गरम केलेली भाजी खाणे अपायकारक ठरू शकते. त्याद्वारे फूड पॉयझनिंग सारख्या तक्रारी उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे चिकन देखील परत परत गरम करू नये. चिकन पुन्हा पुन्हा गरम करीत राहिल्याने त्यामधील प्रथिनाचे कॉम्पोझिशन बदलत जाते.

बटाट्याची भाजी सुकी असो किंवा ग्रेव्ही असलेली असो, ही भाजी सहसा सर्वांच्याच आवडीची असते. पण ही भाजी पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने ही भाजी पचण्यास जड होऊ शकते. त्यामुळे पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. तसेचे बीट कच्चे खाल्ल्याने त्यातील तत्वांमुळे शरीरामध्ये रक्त वाढते. त्यामुळे बीटाचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले आहे. पण जर बीट उकडून घेऊन खाणार असाल, तर एकदा उकडल्यानंतर ते परत परत गरम करून खाणे टाळावे. वारंवार बीट गरम केल्याने त्यामधील नायट्रेट नाहीशी होतात. मशरूमचे सेवन शरीराच्या पचन तंत्राच्या उत्तम कार्यासाठी सहायक आहे. मात्र मशरूम ताजी असावीत, व जेव्हा भाजी बनविली जाईल तेव्हा लगेच खाल्ली जावी. हे भाजी उरवून परत गरम करून खाणे अपायकारक ठरू शकते. त्याचप्रमाणे उरलेला भात किंवा आधी शिजवून किंवा उकडून ठेवलेली अंडी परत गरम करून खाण्याने फूड पॉयझनिंगचा धोका उद्भवू शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment