दर महिन्याला तुम्ही खात आहात २५० ग्रॅम प्लास्टिक


नवी दिल्ली – मोठ्या प्रमाणात होणारा प्लास्टिकचा वापर हा आपल्या शरीराला अपायकारक ठरत आहे. अभ्यासानुसार मनुष्य दर महिन्याला सुमारे 250 ग्रॅम प्लास्टिक खात आहे. मानवी आरोग्यासाठीही वाढता प्लास्टिकचा वापर हा धोकादायक आहे. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये असलेल्या पाण्यात बॉटलचे सुक्ष्म प्लास्टिक आपोआप आपल्या शरीरात सोडले जात आहे. पाण्यातून हे सुक्ष्म प्लास्टिक आपल्या शरीरात जात आहे. याचबरोबर मासे, मीठ यांच्यामाध्यमातून देखील प्लास्टिक आपल्या शरीरात प्रवेश करत आहे. तसेच प्लास्टिकचे सुक्ष्म कण आपल्या शरीरात धुळीच्या माध्यमातून जात असल्याचे ऑस्ट्रेलियातील न्यू कॅसल विद्यापीठातील संशोधकांनी आपल्या अभ्यासात म्हटले आहे.

प्लास्टिकच्या उत्पादनात मागील दोन दशकात असामान्य वाढ झाली आहे. ग्रँड व्ह्यू रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार, येत्या 2025 पर्यंत प्लास्टिक उद्योग हा 4 टक्के वाढेल. मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षेत्र, उद्योग आणि 3 डी प्रिंटिंगमध्ये मायक्रो प्लास्टिकचा वापर केला जातो.उत्पादित केलेले 75% पेक्षा अधिक प्लास्टिक हे नॉन-बायोडिग्रेडेबल कचऱयात बदलत आहेत. सुमारे दहा कोटी टन प्लास्टिक दरवर्षी तयार केले जात असून दरवर्षी 24 लाख टन प्लास्टिक समुद्र, नद्या मध्ये आढळते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment