UGC चे महाविद्यालयांना 30 सप्टेंबरपूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे तसेच, 1 ऑक्टोबरपासून नवीन सत्र सुरु करण्याचे निर्देश


नवी दिल्ली : महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक वेळापत्रक जारी केले आहे. त्यामध्ये महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ही 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी जेणेकरुन 1 ऑक्टोबरपासून नियमित सत्र सुरु केले जाईल, अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत.

या 31 ऑगस्टपूर्वी शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेणे आवश्यक असून त्या ऑनलाईन वा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना दिले आहेत. इंटरमिडिएट विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे आधीच्या सेमिस्टरच्या आधारे करण्यात यावे, त्या संबंधी 2020 साली दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करावे, असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे.

31 जुलै रोजी बारावीचा निकाल लागणार आहे. या निकालानंतर महाविद्यालये आपली प्रवेश प्रक्रिया सुरु करु शकतात. जर काही कारणामुळे बोर्ड परीक्षेचा निकाल लांबला, तर महाविद्यालये 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत आपले शैक्षणिक सत्राला सुरुवात करण्याचे नियोजन करु शकतात, असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे.