गुडघे दुखीमुळे टेनिस स्टार रॉजर फेडररची टोकियो ऑलिम्पिकमधून माघार


नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमधून टेनिस स्टार रॉजर फेडररने माघार घेतली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपण खेळणार नसल्याचे रॉजर फेडररने जाहीर केले आहे. सध्या गुडघ्याच्या दुखण्याने 20 ग्रँड स्लॅम आपल्या नावे करणाऱ्या फेडरर त्रस्त असल्यामुळेच ऑलिम्पिकमध्ये रॉजर सहभागी होणार नाही. यापूर्वीही गुडघ्याच्या दुखण्यामुळे रॉजर फेडररला 2016 रियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता आले नव्हते. तसेच सर्बियाचा जगातील नंबर वनचा टेनिसपटू नोवाक जोकोविचचेही ऑलिम्पिकमध्ये खेळणे निश्चित नाही.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नसल्याचे जाहिर करताना रॉजर फेडररने म्हटले आहे की, मला विम्बल्डन स्पर्धेदरम्यान गुडघ्याचे दुखणे सुरु झाले आणि मी स्विकारले की, मला टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली पाहिजे. फेडरर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नसल्यामुळे निराश आहे. याबाबत बोलताना रॉजर म्हणाला की, मी खरच खूप निराश आहे. कारण मी जेव्हाही स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे, माझ्या कारकिर्दीतील हे सन्मान आणि मुख्य आकर्षण राहिले आहे. या उन्हाळ्याच्या शेवटी मी परतण्याच्या दृष्टीकोनातून आधीच क्वॉरंटाईन सुरु केले आहे. मी संपूर्ण स्विस संघाला शुभेच्छा देतो.

रविवारी संपलेल्या विम्बल्डन 2021 च्या क्वॉर्टर फायनलमध्ये रॉजल फेडररला पराभवाचा सामना करावा लागला होता. 2008च्या ऑलिम्पिकमध्ये डबल्स इव्हेंटमध्ये 39 वर्षाच्या रॉजर फेडररने स्टेन वावरिकासोबत गोल्ड मेडल जिंकले होते. परंतु, सिंगल्समध्ये क्वॉर्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रॉजर फायनल्समध्ये ब्रिटनच्या एंडी मरेकडून पराभूत होत सिल्वर मेडलवर समाधान मानावे लागले होते.