
चंद्रपूर – चंद्रपूरमधील दूर्गापुर येथील जनरेटरमधील गॅस गळतीमुळे कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहित कुटुंबातील सहा जणांचा मृत्यु झाला. अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. या कुटुंबात दहा दिवसांपूर्वी विवाह झाला होता. दरम्यान विषबाधेमुळे मृत्यु झाल्याचे डॉक्टर सांगत आहे.
जनरेटरमधील गॅस गळतीमुळे चंद्रपूरमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
एकाच कुटुंबातील सातजण रात्रीच्या सुमारास झालेल्या या गॅसगळतीमध्ये बेशुद्ध पडले. त्यामधील एकाचे प्राण वाचले आहेत. गॅस गळतीचे प्रकरण लक्षात आल्यानंतर लष्कर कुटुंबातील सातही जणांना बेशुद्धावस्थेत डॉ. विश्वास झाडेंच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण तिथे सहा जणांना मृत घोषित करण्यात आले. तर एका सदस्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
