करोना संक्रमित संपर्कात आल्याने डचेस ऑफ केम्ब्रिज केट होम आयसोलेशन मध्ये
ब्रिटन राजघराण्याची सून, प्रिन्स विलियम्स यांची पत्नी, डचेस ऑफ केम्ब्रिज, केट मिडलटन करोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्या मुळे त्यांना होम आयसोलेशन मध्ये जावे लागले असल्याचे वृत्त आहे. ब्रिटन राष्ट्रीय सेवा विभागाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी केट पती विलियम्स सह या कार्यक्रमात सहभागी होणार होत्या. मात्र त्याअगोदरच त्यांना होम आयसोलेशनमध्ये जावे लागले आहे.
केमिंगस्टन पॅलेस कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार केट गेल्या आठवड्यात एका व्यक्तीला भेटल्या होत्या. त्यानंतर त्या व्यक्तीला करोना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली त्यामुळे ब्रिटन सरकारच्या नियमानुसार करोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना १० दिवस होम आयसोलेशन मध्ये राहणे बंधनकारक आहे.
राणी एलिझाबेथ यांनी राष्ट्रीय स्वास्थ्य सेवा विभागाला ७३ व्या वर्धापनदिनी जॉर्ज क्रॉस वीरता पुरस्कार देऊन सन्मानित केले. गेली ७० वर्षे हा पुरस्कार दिला जात असून ब्रिटन संकट काळात असताना बहादुरीसाठी दिले जाणारे जे पुरस्कार आहेत त्यातील सर्वोच्च सन्मानापैकी हा पुरस्कार आहे. करोना काळात समर्पण भावनेने काम केलेल्या कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार यंदा दिला गेला आहे.