सोशल मीडियात खूपच व्हायरल झाले पुणे पोलिसांचे ते ट्विट


पुणे : सध्या सोशल मीडियात पुणे पोलिसांनी केलेले एक ट्विट तुफान व्हायरल होत आहे. अनुराग कश्यपचा गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपटातील एका डायलॉगचा आधार घेऊन हे ट्विट केले आहे. पुणे शहर पोलिसांनी जनजागृती करण्यासाठी या चित्रपटातील डॉयलॉगच्या मिम्समध्ये वापर केला आहे.

2012 मध्ये रिलीज झालेला गँग्स ऑफ वासेपुरमधील एका सीनवर अतिशय लोकप्रिय असे मिम्स आहेत. याचाच आधार घेऊन पुणे शहर पोलिसांनी ऑनलाईन घोटाळ्याबाबत जनजागृती करणारे ट्विट केले आहे. चित्रपटातील प्रसिद्ध डॉयलॉग “चाबी कहां है?” असे ट्विट करत पोलिसांनी एक प्रकारे इशाराच दिला आहे. स्वस्त किंमतीत दुचाकी वाहनांसारख्या वस्तू विकणार्‍या काही विशिष्ट वेबसाइटवर असत्यापित यादीमध्ये न पडण्याचा इशारा पोलिसांनी या ट्विटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.


फसवणूक करणाऱ्यांविरूद्ध जनजागृती करण्याच्या मोहिमेत पोलिसांनी नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्विटमध्ये पोलिसांनी लिहिलं की, #Cyber Victim to #Fraudster after paying advance for a Scooty listed on OLX/Quikr at ‘Half the Price’ ‍♀️ जर बनायचं असेल ऑनलाईन सौद्यांचा “सरदार”… तर OLX/Quikr विक्रेत्यांची कागदपत्रे पडताळून करा व्यवहार!

ऑनलाईन वाहन खरेदी घोटाळा सध्या बराच सुरु आहे. ऑनलाईन वाहन खरेदी केल्यानंतर कागदपत्रमध्ये बरेच त्रुटी असतात. त्यामुळे जनजागृती करण्याचे पुणे पोलिसांनी ठरवले. ऑनलाईन गाडीचा व्यवहार करताना विक्रेत्यांची कागदपत्रे पडताळूनच व्यवहार करा, असे सांगत पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.