आमिर आणि किरणच्या घटस्फोटावर राखी सावंतने दिली प्रतिक्रिया


बॉलिवूड मिस्टर परफेश्कनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी आपण विभक्त होत असल्याचे काल जाहिर केले आहे. दोघांनी देखील एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून स्वत: आमिरने घटस्फोटाची माहिती दिली आहे. ही बातमी ऐकूण त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. आता त्यांच्या घटस्फोटावर बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर राखी सावंतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

‘ईटाइम्स’ने राखीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. आमिर आणि किरणच्या घटस्फोटाच्या बातमीवर राखीला विश्वास बसत नव्हता. पण, राखीने त्यानंतर तिच्या अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा केव्हा कोणी विभक्त होते, तेव्हा मला वाईट वाटते, असे राखी म्हणाली.


पुढे राखी म्हणाली, एका जुन्या मुलाखतीत तिने आमिरला सांगितले होते की आमिरने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देत किरण रावशी लग्न केले हे मला आवडले नाही. राखीने सांगितलेली गोष्ट आमिरने गांभीर्याने घेतली. राखी पुढे म्हणाली, माझे लग्न होत नाही आहे आणि लोक घटस्फोट घेत आहेत. आमिरजी मी आता कुमारिका आहे, तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटते?

आमिर खान आणि किरण रावची ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर पहिली भेट झाली होती. किरण राव या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरण २८ डिसेंबर २००५ साली विवाहबद्ध झाले होते. तर २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने मुलगा आझादचा जन्म झाला होता. किरण रावशी आमिर खानचे हे दुसरे लग्न होते. या आधी १९८६ सालामध्ये आमिर आणि रीना दत्ता विवाहबंधनात अडकले होते. १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिरला आयरा आणि जुनेद ही दोन मुले आहेत.