पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यामुळे साताऱ्यात पुन्हा कडक लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?


सातारा : आजपासून सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेतच अत्यावश्यक सेवाही सुरु राहणार आहेत. तर शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन केला जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे जिल्ह्यात शनिवारपासून लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. तसेच अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या शनिवार आणि रविवार वगळता वेळेच्या मर्यादेत जिल्ह्यात दुकाने सुरु होती. परंतु, जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी साताऱ्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा लॉकडाऊन पुढील आदेशापर्यंत सुरु राहील, असेही स्पष्ट केल्यामुळे सातारकरांनी आता घरातच राहून प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यात आजपासून काय सुरु, काय बंद?

काय बंद राहणार?

  • शाळा, महाविद्यालये,कोचिंग क्लासेस बंद
  • हॉटेल रेस्टॉरंट बंद, पार्सल सेवा सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत
  • कोणत्याही क्रिडा स्पर्धा घेता येणार नाहीत
  • सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रार्थनास्थळे बंद
  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत उघडी राहणार

काय सुरु राहणार?

  • किराणा, भाजीपाला, फळ विक्री, डेअरी, बेकरी दुकाने सुरु राहणार
  • मटण, चिकन, अंडे, मासे विक्री सुरु राहणार
  • रिक्षा, टॅक्सी सुरु राहणार
  • खाजगी, सहकारी बँका सुरु राहणार
  • सर्व बाजार समित्या सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार
  • खाजगी वाहतूक सुरु राहणार
  • खाजगी बसने 50 टक्के क्षमतेने वाहतूक सुरु राहणार
  • पॅट्रोल पंप सुरु राहणार
  • दुध संकलन केंद्र सुरु राहणार
  • कृषीविषयक सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार
  • शिवभोजन थाळी केवळ पार्सल सेवा सुरु
  • शीतगृह आणि गोदाम सुरु राहणार