‘या’ रोमॅण्टिक चायनीज चित्रपटात झळकला होता ‘तारक मेहता…’मधील पोपटलाल


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले या काही दुमत नाही. आपल्या दमदार अभिनयाने या शोमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. चाहते कायमच या शोमधील प्रत्येक कलाकाराबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. यातीलच एक महत्वाचे पात्र म्हणजे ‘पत्रकार पोपटलाल’. या मालिकेला पोपटलाल आणि त्याच्या लग्नाचे टेंशन यामुळे एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे. मालिकेत पोपटलाल ही महत्वाची भूमिका अभिनेता श्याम पाठक साकारत असून ही भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

पण ‘तारक मेहता… ‘या शोमध्ये पोपटलालची भूमिका साकारणाऱ्या श्याम पाठकने हॉलिवूड चित्रपटातही काम केल्याची माहिती आपल्यापैकी अनेकांना नसेल. खर तर श्याम पाठकने ‘लस्ट कॉशन’ या एका चायनीज चित्रपटात काम केले असून हा एक रोमॅण्टिक चित्रपट होता. हा चित्रपट २००७ सालात रिलीज झाला होता. पोपटलालने म्हणजेच श्याम पाठकने या चित्रपटात एका दागिन्यांच्या दुकानातील विक्रेत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटात श्याम पाठकसोबत अभिनेता अनुपम खेर देखील झळकले होते. या चित्रपटातील पोपटलालचा सुटा-बुटातील लूक पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.


तर पोपटलालचे या व्हिडीओतील इंग्रजी ऐकूनही तुम्हा अवाक व्हाल. पोपटलालनेच म्हणजेच अभिनेता श्याम पाठकने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. माझ्या जुन्या कामापैकी एक..जुने दिवस..हॉलिवूड” असे तो आपल्या कॅप्शनमध्ये म्हणाला आहे. श्याम पाठक ‘लस्ट कॉशन’ या चित्रपटातील अनेक सीनमध्ये आहे. पोपटलाल ही त्याची भूमिका गाजली असली तरी श्यामने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.