राज्यात आजपासून लागू होणार लेव्हल तीनचे निर्बंध; जाणून घेऊया कुठे काय सुरु, काय बंद


मुंबई – आजपासून राज्यातील दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर राज्यात संचारबंदी असेल. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यातील शहरे आणि जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

राज्यामध्ये कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच लेव्हलमध्ये निर्बंध शिथिल केले होते. पण निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्यानंतर अवघ्या काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला असल्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.

दरम्यान पुणे महानगरपालिकेने आधीच्या नियमावलीमध्ये बदल केला आहे. पुणेकरांना आजपासून (28 जून) नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार-रविवार पूर्णपणे बंद राहतील. पुण्यात सध्या दुकाने सात वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी होती.

आजपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

 • अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील.
 • मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.
 • रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.
 • उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.
 • खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत.
 • अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालये शंभर टक्के क्षमतेने.
 • लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोरोनासंबंधी सर्व नियम पाळणे आवश्यक
 • अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
 • पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी
 • कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील

नव्या निर्बंधांची कल्याण डोंबिवलीतही अंमलबजावणी – कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लसचा धोका पाहता राज्य शासनाने आजपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आता लेव्हल 3 मध्ये समावेश करण्यात आला असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही त्यानुसार निर्बंध लागू होत आहेत. या आठवड्यात केडीएमसीचा लेव्हल 2 मध्ये समावेश झाल्यामुळे निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाले होते. पण राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे केडीएमसीलाही लेव्हल 3 मध्ये समाविष्ट करण्यात आले असून प्रशासनाने यासंदर्भातील नवीन आदेश नुकतेच जारी केले आहेत. सोमवार 28 जून ते 5 जुलैपर्यंत त्यांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

 • या नव्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहतील.
 • हॉटेल आणि रेस्टॉरंटही दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. त्यानंतर पार्सल किंवा टेक अवे पद्धतीने सुरु ठेवता येतील.
 • मॉल आणि मल्टिप्लेक्स यांना मात्र कोणत्याही प्रकारे सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आलेली नाही.
 • कल्याण डोंबिवलीत सर्व व्यवहार सायंकाळी वाजेपर्यंतच सुरु राहतील तर दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील. त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
 • सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सकाळी फिरता येईल. याच वेळेत मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल.
 • खाजगी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली राहतील.
 • लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार 50 टक्के क्षमता वापरता येईल.

आजपासून सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात नवे निर्बंध

 • शहरातील सर्व दुकानांना आता संध्याकाळी 4 पर्यंत परवानगी
 • बिगर अत्यावश्यक सेवा शनिवार रविवार संपूर्ण बंद
 • मॉल्स, थिएटर संपूर्ण पणे बंद
 • सोमवार ते शुक्रवार पर्यंत हॉटेल्स रेस्टॉरंट संध्याकाळी 4 पर्यंत त्यानंतर रात्री 11 पर्यंत केवळ पार्सलची सुविधा
 • सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात संध्याकाळी 5 पर्यंत जमावबंदी तर 5 नंतर संचारबंदी
 • आज सकाळी 7 वाजल्यापासून आदेश लागू

यवतमाळ जिल्ह्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत 28 जूनपासून नवीन आदेश काढण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. सोमवार ते शुक्रवारपर्यंत 4 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची वेळ असणार आहे. तर शनिवार रविवार पूर्णतः बंद असणार आहे. हॉटेल रेस्टॉरंट 4 वाजेपर्यंत, बँक 4 वाजेपर्यंत सुरु असणार आहे. तर शाळा कॉलेज, शिकवणी, मंदिर पूर्णपणे बंद असणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश जारी केले आहेत.

आजपासून जालना जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संध्याकाळी 5 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी तसेच जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि आस्थापना सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि आस्थापना पूर्णपणे बंद असतील. हॉटेल 50 टक्के क्षमतेने सायंकाळी 4 पर्यंत सुरु राहणार आहेत. दरम्यान या काळात 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित जमण्यास देखील मनाई असणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद राहतील.

बुलढाणा जिल्ह्यात आजपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद रहातील.

आजपासून अकोला जिल्ह्यात जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद रहातील.

अमरावती जिल्ह्यात आजपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद रहातील.