जगातील सर्वात महाग सँडविच


अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील रिट्झ हॉटेलमध्ये जगातील सर्वात महाग असणारे सँडविच बनविले गेले आहे. अस्सल सोन्याचा वर्ख असलेल्या ह्या सँडविच ची किंमत २१४ अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच तब्बल १३,८४७ रुपये इतकी आहे ! या सँडविचचा समावेश आता जगातील सर्वात महागडे सँडविच म्हणून गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ही केला गेला आहे.

हे सँडविच खाण्याची ज्यांची इच्छा असेल, त्यांना दोन दिवस अगोदरपासूनच या सँडविच ची ऑर्डर द्यावी लागते असे रिट्झ हॉटेलचे शेफ जोई काल्डेरोनी म्हणतात. अमेरिकेमध्ये दरवर्षी राष्ट्रीय सँडविच दिवस साजरा केला जातो, त्या निमित्ताने हे जगातील सर्वात महाग सँडविच बनविण्याची कल्पना सुचली असल्याचे काल्डेरोनी म्हणतात.

या सँडविचमध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या चीजचा वापर केला जात असून, हे चीज आधी तव्यावर भाजून घेऊन मग सँडविचमध्ये घातले जाते. चीज हे पचनक्रियेसाठी अतिशय चांगले समजले जाते, त्यामुळे या सँडविच मध्ये चीज चा प्रामुख्याने वापर केला गेला असल्याचे शेफ म्हणतात. सँडविचमध्ये चीज घातल्यानंतर टोमॅटो, काकड्या आणि इतर स्वादिष्ट फिलिंग्स भरून सँडविच तयार केले जाते. अखेरीस २३ कॅरट शुद्धतेचा सोन्याचा वर्ख या सँडविच वर लावला जाऊन मग हे सँडविच ग्राहकास सर्व्ह केले जात असल्याचे शेफ सांगतात.

Leave a Comment