राज्यात आज दिवसभरात ८ हजार ७५२ रुग्णांची कोरोनावर मात, १५६ रुग्णांचा मृत्यू


मुंबई – महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच फटका बसला. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. पण, कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचे आव्हान आता हळूहळू राज्यातील आणि देशातील आरोग्य यंत्रणांसमोर उभे राहू लागले आहे. डेल्टा प्लसचे राज्यात सर्वाधिक रूग्ण आहेत. त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने उपाय योजना सुरु केल्या आहेत. दरम्यान, राज्यात कोरोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. शुक्रवारी १५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर आज (शनिवार) १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात राज्यात ८ हजार ७५२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५७ लाख ८१ हजार ५५१ एवढा झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी ९५.९३ टक्के एवढे झाले आहे. ही आरोग्य यंत्रणांसाठी आणि राज्य सरकारसाठी देखील दिलासादायक बाब ठरली आहे.

राज्यात आज ९,८१२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर ८,७५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता ५७,८१,५५१ झाली आहे. तसेच राज्यात आज १७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.० टक्के आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०८,३१,३३२ नमुन्यांपैकी ६०,२६,८४७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२८,२९९ रुग्ण घरी उपचार घेत आहेत. तर ४,२७२ रुग्ण संस्थात्मक क्कारंटाईन आहेत.