ट्विटर युजर्संना आता इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर करता येणार ट्विट


आता आपल्या युजर्ससाठी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने एक नवीन फिचर आणले आहे. ट्विटर युजर्सना आता त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्येही आपले ट्विट शेअर करता येणार आहे. ट्विटर गेल्या वर्षापासून या नव्या फिचरची चाचणी करत होते. जे लोक नियमितपणे त्यांचे ट्विट फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर करतात, त्यांच्यासाठी हे नवीन अपडेट कोणत्याही भेटीपेक्षा कमी नसणार आहे. या फिचरच्या येण्यापूर्वी ट्विटर युजर्स आपल्या ट्विटचे स्क्रीनशॉट इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत होते.

सध्या केवळ ios युजर्ससाठी ट्विटरचे हे नवीन अपडेट फिचर असून यासाठी अँड्रॉइड वापरकर्त्यांना बराच काळ थांबावे लागणार असल्यामुळे ios युजर्संना हे नविन फिचर तात्काळ वापरता येणार आहे.

जर ट्विटरचे हे नवीन फिचर वापरण्याची तुम्हालाही इच्छा असेल तर पहिल्यांदा तुमचे ट्विटर अ‍ॅप अपडेट करा. त्यानंतर इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये जे ट्विट शेअर करायचे त्याच्या शेअर बटणावर क्लिक करा आणि नंतर इंस्टाग्रामचा पर्याय निवडा.

ट्विटरवर इंस्टाग्राम निवडल्यानंतर ते ट्विट इंस्टाग्रामवरील स्टोरीजमधील ड्राफ्टमध्ये सेव्ह होईल. त्यानंतर आपण इन्स्टाग्राम अ‍ॅप उघडून स्टोरी पब्लिश करू शकता. पब्लिश करण्यापूर्वी आपण त्यात स्टिकर किंवा काही ओळीदेखील त्यासोबत जोडू शकता. त्यानंतर तुमचे ट्विट हे तुमच्या इन्स्टास्टोरीवर तुम्हाला पाहायला मिळेल. इन्स्टाग्राममध्ये पोस्ट केलेल्या ट्विटवर क्लिक करून, कोणीही ट्विटरवर जाऊ शकत नाही. या व्यतिरिक्त आपण इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये प्रोटेक्टेड ट्विट देखील शेअर करू शकत नाही.

दरम्यान, आणखी एक नवीन फिचर ट्विटर लवकरच जाहीर करणार आहे. ट्विटरच्या नव्या अपडेटनंतर आपण स्वतः निश्चित करु शकता की ट्विटवर कोण रिप्लाय करु शकतो आणि कोण नाही. म्हणजे ट्विट केल्यानंतर युजरला फिल्टरचा पर्याय मिळणार आहे. अद्याप हे फिचर कधीपर्यंत याबाबात कोणतीही माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही.